शॉर्टसर्किटमुळे जंगल परिसराला आग

कारंजा : तालुक्यातील नारा येथील मोटवाणी स्टोन क्रेशरजवळ असलेल्या जंगल परिसराला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना दुपारी 2 वाजताच्या सुमारास घडली. विद्युत खांबाबर शॉर्टसर्किट झाल्याने खांबाच्या बाजूला असलेल्या गावात आग लागली. आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले व जवळपास अर्धा एकर परिसराला आगीने आपल्या कवेत घेतले होते. वनविभागाला घटनेची माहिती मिळाल्यानंतर लगेच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन आग विझवली. यावेळी वनविभागाचे कर्मचारी एम. पी. बावनकर, पी.पी. कडसाईत, हंसराज कुरसंगे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here