वर्धा : गॅसप्रमाणेच वीज सबसिडीही लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर दिली जाणार आहे. त्यासाठीचे नवीन वीज विधेयक येत्या हिवाळी अधिवेशनात शासनाकडून सादर होण्याची शक्यता आहे. हे विधेयक सर्वानुप्रते पारित झाल्यावर त्याचा जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागांमधील गरजवंतांना सर्वाधिक फायदा होणार आहे.
या नवीन विधेयकात नेमके काय राहणार याची अधिकची माहिती अद्याप महावितरणच्या स्थानिक कार्यालयांना प्राप्त झाली नसली तरी ते लवकरात लवकर सादर होते काय, तसेच सर्वानुमते पारित होते काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असले तरी गॅस सबसिडीप्रमाणे याचे होऊ नये अशी अपेक्षा नागरिकांना आहे.