

वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिवसानिमित्त तीन दिवसीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाचा समारोप आज (31 ऑगस्ट) सकाळी भव्य सायकल रॅली काढून झाला. रॅलीतून विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी निरोगी जीवनशैली व पर्यावरणपूरक वाहतूक याचा संदेश दिला. सकाळी 8:30 वाजता मुख्य प्रवेशद्वारापासून छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारापर्यंत सायकल रॅली काढण्यात आली. कार्यवाहक कुलसचिव कादर नवाज खान यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात केली. कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने यात सहभागी झाले.
कार्यक्रमात डॉ. अशोकनाथ त्रिपाठी, क्रीडा दिवस समन्वयक डॉ. समरजीत यादव, सायकल रॅली समन्वयक डॉ. हेमचंद्र ससाने यांच्यासह डॉ. जयंत उपाध्याय, डॉ. प्रकाश त्रिपाठी, डॉ. अनिकेत मिश्र, डॉ. प्रमोद जोशी, डॉ. शिवसिंह बघेल, डॉ. रणंजय सिंह, डॉ. वरुण उपाध्याय, डॉ. हेमंत धामट, राजेश अरोरा, बी.एस. मिरगे, सुधीर खरकटे, कमल शर्मा, विवेक त्रिपाठी, रवींद्र वानखडे, प्रीती खोडे, नीतू सिंह, भूषण साळवे, सुनील ढोरे, हेमंत दुबे, मिथिलेश राय आदी प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी सहभागी झाले. तसेच एनसीसी कॅडेट्स आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवकही रॅलीत सामील झाले.
रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी सुनील कुमार, अश्विन श्रीवास, संदीप पेटकर, मनोज वर्मा, प्रफुल गिरमकर, मंगेश वाघमारे, सतीश डोंगरे, प्रफुल राऊत व सुरक्षा कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. दरम्यान, महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त 29 ते 31 ऑगस्टदरम्यान “एक घंटा खेल” या उपक्रमांतर्गत धावणे, लिंबू-दौड, दोरी-उडी, व्हॉलीबॉल, खो-खो, बॅडमिंटन आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यात विद्यार्थी व कर्मचारीवर्गाने उत्साहाने सहभाग नोंदवला.