जुन्या वादातून मित्रानेच केले मित्रावर कटरने वार! पोलिसात तक्रार दाखल

वर्धा : जुन्या वादाचा मनात राग धरुन संधी मिळताच मित्राच्याच गळ्यावर कटरने वार करत जखमी केल्याची घटना कारला चौक परिसरात १३ फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० च्या सुमारास घडली. या प्रकरणात रामनगर पोलीस आरोपीचा शोध घेत असल्याची माहिती आहे. गणेश अशोक रेंगे याचा महाबळा येथे अपघात झाल्याने त्याचे मित्र खुशाल राऊत, पराग चौधरी आणि श्याम लंगडे हे तिघे त्याला आणण्यासाठी (एमएच ३२, सी १११९) क्रमांकाच्या वाहनाने गेले होते.

तेथून वर्ध्याकडे येत असताना खर्रा खाण्यासाठी ते चौघेही रात्री ९.३०च्या सुमारास कारला चौक परिसरात थांबले असता, आरोपी श्याम लंगडे याने जुन्या वादाच्या कारणातून गणेशला मागाहून पकडत त्याच्या गळ्यावर कटरने वार करत गंभीर जखमी केले. तसेच हातापायावर जबर मारहाण करत जखमी केले. याप्रकरणी रामनगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून, आरोपी श्याम लंगडे हा फरार असल्याची माहिती रामनगर पोलिसांनी दिली आहे. पोलीस आरोपीच्या मागावर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here