उद्या दस-याच्या दिवशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु राहणार! नविन वाहनाची होणार नोंदणी

वर्धा : दस-याच्या मुर्हूतावर नागरिक वाहनाची मोठया प्रमाणावर खरेदी करीत असल्यामुळे 15 ऑक्टोबरला नविन वाहनाची नोंदणी करण्याकरीता उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु राहणार आहे. याची वाहन खरेदी करणा-या व वाहन विक्रेत्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन सहाय्यक परिवहन अधिकारी तुषारी बोबडे यांनी केले आहे. सदर सुट्टीचे दिवशी नविन वाहनाची नोंदणी व कर वसुलीचे कामकाज करण्यात येणार असल्याचे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here