

वर्धा : विहिरीत उडी घेत आष्टीत एका युककाने तर वडनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बोंदुर्णी येथील एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.
रुमानोद्दीन एजाजोह्दीन काजी रा.काजीपुरा याने शेतातील विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. त्याचा मृतदेह परिसरातील नागरिकांनी गळ टाकून बाहेर काढला. याप्रकरणी आष्टी पोलिसात नोंद करण्यात आली. तर लहान आर्वी येथील रुपाली ज्ञानेश्वर ढोके हिने कापूस वेचण्यास गेली असता तिचा तोल जाऊन ती विहिरीत पडली.