डॉक्टरच्या घरी चोरी! ३१ हजाराचा मुद्देमाल लंपास

वर्धा : सेवाग्राम रुग्णालयातील कार्यरत असलेल्या डॉक्टराच्या घरून अज्ञात चोरट्यांनी ३१ हजाराचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना नालवाडी येथील सुराना ले-आऊट येथे घडली. शहरासह ग्रामीण भागात चोरीच्या घटना दिवसेंदिसव घडत आहेत. नालवाडी येथील सुराना ले-आऊट येथील रहिवासी डॉ. अमेय अशोक धात्रक हे सेवाग्राम येथील रुग्णालयात कार्यरत आहेत.

५ नोव्हेंबर रोजी ते आपल्या परिवारासोबत हिंगणघाट तालुक्‍यातील इंझाळा येथे गेले होते. घराची पाहणी केली असता अज्ञात चोरट्यांनी घरातील शेवटच्या दरवाजातून प्रवेश करून घरात असलेले लेपटॉप व बेडरुममधील रोख, दागिने असा एकूण ३१ हजारांचा मुहेमाल लंपास केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here