शनिवार अन्‌ रविवार सायबर भामट्यांचा ‘वार’! दोन दिवसांत तक्रारींचा ओघ वाढला

वर्धा : जिल्ह्यात सायबर क्राईमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या गुन्ह्यांमध्ये महिलांना टार्गेट केल जात असल्याचेही धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. यामध्ये सर्वाधिक गुन्हे हे फसवणूक, बँकिंग, फ्रॉड, अकाऊंट हॅकिंग, नेट बँकिंग आदी सायबर गुन्ह्यांचा समावेश आहे. शनिवार आणि रविवारी बँका बंद असल्याने सायबर भामट्यांकडून नागरिकांना फसवणुकीच्या घटना घडताना दिसून येत आहे. मागील काही दिवसांत सायबर सेलकडे तक्रारी वाढल्या असून नागरिकांनी सणासुदीच्या काळात अधिक सावधगिरी बाळाण्याचे आवाहन सायबर सेलकडून करण्यात आले आहे.

आजकाल आर्थिक व्यवहार जास्तीत जास्त डीजिटल पद्धतीने करण्यात येते आहेत. याच संधीचा फायदा सायबर गुन्हेगारांनी घेतल्याचे दिसून येत आहे. व्हॉट्सअप, इंटरनेट बँकिंग आदींच्या माध्यमातून सर्वाधिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अनोळखी लिंकला क्लिक करताना दहा वेळा विचार करावा, अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here