वाहनाच्या धडकेत एक ठार! दोन जखमी; वायगाव लसनपूरच्या वळणावरील घटना

समुद्रपूर : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार युवक जागीच ठार झाला तर त्याचे दोन सहकारी जखमी झाले आहेत. ही घटना तालुक्‍यातील हिंगणघाट- उमरेड मार्गावरील वायगाव लसनपुरच्या वळणावर बुधवारी रात्री ९ वाजताच्या दरम्यान घडली.

प्राप्त माहितीनुसार बुधवारी रात्री ९ वाजताच्या दरम्यान, वडगाव येथील प्रतिक मुन व रवि मुन हे दोघेही आपल्या दुचाकीने बुटीबोरी येथे राहत असलेल्या स्नेहल मुन याला जामवरुन घेऊन येत होते. दरमायन वडगाव लसनपुरच्या वळणावर भरधाव वेगाने गिरडकडून जामकडे जात असलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात प्रतिक मुन (22) यांचा जागीच मृत्यू झाला. तर स्नेहल मुन व रवि मुन जखमी झाले.

या अपघाताची माहिती मिळताच समुद्रपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे प्राथमिक उपचारानंतर दोन्ही जखमींना पुढील उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती आहे. या अपघाताचा पंचनामा पोलिसांनी केला असून पुढील तपास समुद्रपूर पोलिस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here