
वर्धा : पेट्रोलपंप हटाव कृती समितीच्या वतीने गुरुवार 11 नोव्हेंबर रोजी एकदिवसीय साखळी भीम आर्मी संघटनातर्फे जिल्हाध्यक्ष आशीष सोनटक्के तसेच बंटी रंगारी, राज मुन, शशांक भगत, अविनाश खेळापुरे यांनी साखळी उपोषण केले. पेट्रोल पंप हटाव कृती समिती मधील सहभागी सर्व आंबेडकरी व पुरोगामी संघटना कार्यकर्ते यांनी सरकार – पालकमंत्री- आमदार,पोलीस व जिल्हा प्रशासनचा सिव्हिल लाईन वर्धा येथील डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळील शासनाच्या पेट्रोल पंप ची जागा स्थलांतरित करण्याच्या मागणीसाठी शासनाचा विरोध करुन साखळी उपोषण केले आहे.
महाविकास आघाडी आणि भाजपच्या केंद्र सरकारने पोलिस वेल्फेअरच्या पेट्रोलपंपाची डाँ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजबळीळ जागा त्वरित स्थलांतरित करावी. या मुख्य मागणीसाठी जिल्हा पेट्रोलपंप हटाव कृती समितीच्या वतीने लोकशाही मार्गाने साखळी उपोषण 57 व्या दिवशीसुद्धा नाकर्त्या सरकारच्या विरोधात सुरु आहे.



















































