जागतिक दर्जाच्या टाइम्स मॅगझीनवर झळकलेल्या अर्चना घुगरे याचा मनसेने केला सत्कार! पैठणी, सन्माणचिन्ह व पुष्पगुच्छ दिले भेट

पवनार : येथील जागतिक दर्जाच्या टाइम्स मॅगझीन वर झळकलेल्या आशा स्वयमसेविका अर्चना रामदास घुगरे याच्या कार्याची दखल घेत मनसे पदेश सरचिटणीस हेमंत गडकरी मनसे जिल्हा अध्यक्ष अतुल वादिले याच्या मार्गदशनात व महाराष्ट नवनिर्माण विध्यार्थी सेनेचे वर्धा जिल्हा अध्यक्ष शुभम दाडेकर यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, पैठणी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कोरोनाच्या काळात अत्यंत कमी मानधनावर प्रामाणिकपणे आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या आशा वर्कर असलेल्या पवनारच्या अर्चना रामदास घुगरे याची दखल जागतिक पातळीवर टाइम्स मॅगझीन ने घेतली. वर्धेतील कुठल्याही व्यक्‍तीची टाइम्स सारख्या लोकाभिमुख मासिकाच्या कव्हर पेजवर फोटो झळकने बहुदा ही पहीलीच वेळ असावी, हे वृत्त मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी एका वृत्त वाहिनीवर बघितले, त्यांनी लगेच सेलू येथील रहिवासी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे वर्धा जिल्हा अध्यक्ष शुभम दांडेकर यांना ही बाब सांगितली , शुभम दाडेकर यांनी लगेच अर्चना घुगरे यांच्या सारख्या सर्वसामान्य महिलेला मिळालेला हा बहुमान लक्षात घेता त्यांच्या गौरव व्हावा याकरिता तयारी सरू केली.

आज त्यांनी आपल्या निवडक सहकाऱ्यासोबत पवनार येथील अर्चना घुगरे यांचे घर गाठले, अचानकपणे मनसेच्या मंडळीना आपल्या सत्कारासाठी आलेले बघून घुगरे परिवाराला आनंदाचा धक्काच बसला, शभम दांडेकर यांनी अर्चना घुगरे यांना पैठणी, सन्माणचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविले, आपल्या प्रामाणिक कार्याची दखल मनसेने घेतल्याने अर्चना घुगरे व त्यांच्या परिवारातील सदस्य भारावून गेले, यावेळी मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी मोबाईल फोनवरून अर्चना घगरे यांचेशी संवाद साधला व त्या करीत असलेल्या कार्याबद्दल व टाइम्सच्या कव्हर पेजवर मिळालेल्या स्थानाबद्दन कौतूक केले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे वर्धा जिल्हा अध्यक्ष शुभम दांडेकर, रोशन कोंबे, सचिन धांदे, हरीश भस्मे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here