डॉक्टरच्या घरातून ७०० अमेरिकन डॉलर नेले चोरुन! न्यू स्टेट बँक कॉलनीतील घटना

वर्धा : चोरट्यांनी कुलूपबंद घराच्या दाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करीत ७०० अमेरिकन डॉलर आणि कपाटात ठेवलेली एक लाख रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. ही घटना न्यू स्टेट बँक कॉलनी परिसरात असलेल्या निसर्गनगरी येथे उघडकीस आली. पोलीस सूत्रांनुसार, डॉ. राम उपासराव ठोंबरे (६७) हे सहकुटुंब बाहेरगावी गेले होते.

घरी आल्यानंतर त्यांना घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त दिसून आल्याने त्यांना घरात चोरी झाल्याचे समजले. डॉ. राम ठोंबरे हे काही काळ अमेरिकेत वास्तव्याला होते. वर्ध्यात आल्यावर ते निसर्गनगरी येथे राहू लागले. ८ जून रोजी ते नागपूर आणि अमरावती येथे नातवाला भेटण्यास गेले होते. जाताना त्यांनी घराला कुलूप लावले होते. पण, चोरट्यांनी घरी कुणी नसल्याचे पाहून रात्रीच्या सुमारास त्यांच्या दाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करीत घरातील कपाटात ठेवलेली एक लाख रुपयांची रक्कम आणि ७०० अमेरिकन डॉलर चोरुन नेले. डॉ. राम ठोंबरे यांनी तत्काळ याची माहिती रामनगर पोलिसांना दिली.पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करीत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार धनाजी जळक करीत आहे.

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here