महादेवाच्या नावाने चांगभल हो…. चांगभल! ग्रामीण भागात नंदीबैलाचे दर्शन; लहानग्यांना नंद्याचे आकर्षन

मोहन सुरकार

सिंदी (रेल्वे) : इंटरनेट आणि काॅन्व्हेटच्या आजच्या जगात ख्रिसमसचा “संता” सर्व लहान मोठ्याच्या परिचयाचा झाला आहे. मात्र कृषी प्रधान भारत देशात शेतकर्याचे आराध्य दैवत असलेला नंदीबैल घेऊन दारोदारी महादेवाच्या नावाने चांगभल हो….चांगभल म्हणत दान मांगणारा नंदीबैलवाला आज लुप्त पावत चालला आहे.
परिणामता आजच्या काळातील बालगोपालांना असा नदीबैलवाला दिसला तर पर्वणीच म्हणावी लागेल.

शहरात शुक्रवार (ता.२५) ख्रिसमसच्या दिवशीच नंदीबैलवाला आला आणि महादेवाच्या नावाने चांगभल हो….. चांगभल म्हणत दारोदारी दान मागत सुटला आजच्या काॅन्व्हेटच्या संस्कृतीत लहान्याचे मोठे होणार्या शहरातील बच्चेकंपनी हा दुर्मिळ योग चालुन आल्याने त्यांनी या नंदीबैल वाल्याच्या मागे चांगलीच झुब्बंड केलेली पाहायला मिळाली.

नंदी पौळ्यासाठी विदर्भातच नाही तर समंध महाराष्ट्रात विशेष प्रसिद्ध असलेल्या सिंदी रेल्वे शहरात आज या नंदीबैल वाल्यांने लहानांना जशी भुरळ घातली तशीच काहीशी मोठ्यांना सुध्दा या नंदीबैलवाल्याने आज शहरात येवुन अनेक दिवसांनी आश्चर्याचा सुखद धक्काच दिला. अनेकांनी आप-आपल्या घरी या नंदीबैलाचे मनोभावे पुजन करून गोडधोड खाऊ घातले शिवाय यथाशक्ती नंदीमालकाला दान सुध्दा केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here