अज्ञात वाहनाच्या भीषण धडकेत दोन युवकांचा मृत्यू! कुटूंबात दोघेही एकुलते ऐक; पवनारात शोककळा

पवनार : अज्ञात वाहनाच्या भीषण धडकेत दोन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना वर्धा-अमरावती रोडवर बोरगाव धांदे शिवारात मंगरूळ दस्तगीर जवळ शुक्रवार ता. २५ रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. रुपेश बंडुजी तिघरे (वय २९) व अक्षय श्रावणजी बोरकर वय (२३) दोघेही राहणार पवनार, अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे पवनार येथे शोककाळा पसरली आहे.

प्राप्त माहितीनुसार मृत रुपेश तिघारे व अक्षय बोरकर हे दोघेही एम एच ३२ यू ९५७२ क्रमांकाच्या दुचाकीने रुपेशच्या भाचीच्या वाढदिवसाला गेले होते. कार्यक्रम आटपून घरी येत असताना अमरावती रोडवर बोरगाव धांदे शिवारात मंगरूळ दस्तगीर जवळ अज्ञात वाहनाच्या भीषण धडकेत दोघांच्याही डोक्याला जबर मार लागल्याने अक्षय बोरकर याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर रुपेश तिघरे गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारार्थ सांवगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला.

मृतक रुपेश हा पानटपरी चालवीत होता. त्याला सहा महिन्याचा मुलगा आहे. तर अक्षय हा पेंटिंगचे काम करीत होता. हे दोघेही कुटूंबातील एकुलते एक व कमवते होते, कमवत्या मुलांचा अपघाती मृत्यू झाल्याने कुटूंबीयांवर संकट कोसळले आहे. अपघातात दोन युवकांचा मृत्यू झाल्याने पवनारात शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here