दुचाकीचोराला अटक! घाटंजी पोलिसांची कारवाई

घाटंजी : काही दिवसापासून शहरात दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते. अशातच 24 डिसेंबरला महात्मा वॉर्डातून मुरली येथील सचिन गोविंदराव पावडे यांची दुचाकी क्रमांक एमएच-29 -एजी 4476 ही दुचाकी ल॑पास झाली होती. पावडे यांच्या फिर्यादीवरून घाटंजी पोलिसांनी तपास करून पार्डी येथिल संतोष गोविंदा कोवे, वय 32 याचे विरूध्द भादवी 379 अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

पोलिसांनी आरोपीचा पीसीआर घेतला असता, आणखी दोन दुचाकी असल्याची कबुली आरोपीने दिली. त्यावरून पोलिसांनी त्या दुचाकी ताब्यात घेतल्या आहे. तर मुरली येथील सचिन गोविंदराव पावडे यांची दुचाकी बेवारस स्थितीत सापडून आली होती. सदर दुचाकींची किंमत अंदाजे 85 हजाराच्या घरात आहे. आणखी त्यांचे कडून काही दुचाकी मिळण्याची श्यक्यता वर्तविल्या जात आहे.पोलीस निरीक्षक मनिष दिवटे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विलास सिडाम, जमादार राहुल खंडागळे, ‘पोलीस कॉन्स्टेबल विशाल वाढई अधिक तपास करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here