मुलाची आत्महत्या नसून घातपात असल्याची केली तक्रार

समुद्रपूर : शहरातील ओमकार ले-आऊट परिसरातील विहिरीमध्ये युवकाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना गुरुवारी उघडकीस आली असून, ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला.

प्रवीण रामाजी ठाकरे रा. ओमकार ले-आऊट असे मृताचे नाव आहे. त्याचा विहिरीमध्ये संशयास्पदरीत्या मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी गर्दी केली. घरामध्ये कुठलाही कलह नसताना अचानक मुलाने आत्महत्या करण्याचा निर्णय का घेतला? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. मृताचे वडील रामाजी ठाकरे यांनी ही आत्महत्या नसून घातपात असल्याची तक्रार केली आहे. पुढील तपास ठाणेदार प्रशांत काळे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक पंकज मसराम, अनिल वाघमारे व जाधव करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here