ईट राईट स्पर्धेत वर्धा जिल्ह्याचा देशपातळीवर सन्मान! केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्याहस्ते जिल्ह्याचा गौरव; अमृत महोत्सवानिमित्तस 75 जिल्ह्याचा सन्मान

वर्धा : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अन्न सुरक्षा व मानके कायद्याची उत्कृष्ट अंमलबजावणी करण्यासोबतच अन्नपदार्थ्याच्या दर्जात चांगले काम करणा-या देशातील 75 जिल्ह्यांना सन्मानित करण्याची घोषणा केंद्र शासनाच्यावतीने करण्यात आली होती. वर्धा जिल्हयाने या बाबतीत उत्कृष्ट काम केल्याने नवी दिल्ली येथे आयोजित समारंभात जिल्हयाचा देशपातळीवर गौरव करण्यात आला आहे.

भारतीय अन्न सुरक्षा प्राधिकरणाच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त उत्कृष्ट काम करणा-या जिल्हयाचा गौरव करण्यासाठी ईट राईट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हृयाने अन्न सुरक्षा व मानके कायद्याची उत्कृष्ट अंमलबजावणी केली असून ग्राहक जागृती, अन्न परवाने व नोंदणी कामकाज, अन्न व्यवसायिकाचे प्रशिक्षण, अंगणवाडी सेविका प्रशिक्षण, ईट राईट कॅम्पस, फुटपाथ व विविध ठिकाणी होणा-या अन्न पदार्थाचा दर्जा उत्कृष्ट राहण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने जिल्हयात उत्कृष्ट काम केले.

या स्पर्धेसाठी केंद्र शासनाच्या वतीने राज्य व जिल्ह्यांची सन्मानासाठी निवड केली असून महाराष्ट राज्याने या स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकाविला आहे. जिल्हयानेही उत्कृष्ट काम करुन 75 जिल्हृयांमध्ये आपले स्थान पटकाविले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते जागतिक अन्न सुरक्षा दिनी नवी दिल्ली येथील समारंभात गौरविण्यात आले. राज्य स्तरावरील तिसरा व जिल्हयाचा विशेष पुरस्कार अन्न सुरक्षा आयुक्त परिमल सिंह यांनी स्विकारला. आयुक्त परिमल सिंह यांच्या मार्गदर्शनात नागपूर विभागाचे सहआयुक्त सुरेश अन्नपुरे, जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त जयंत वाणे, अन्न सुरक्षा अधिकारी किरण गेडाम, राजेश यादव, प्रशांत लोहार व कर्मचा-यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाच्या बळावर जिल्हयाला हा गौरव प्राप्त होऊ शकला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here