

वर्धा : पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरवाढीला कंटाळून समता सैनिक दल सुरक्षा विभागप्रमुख यांनी समतानगर येथील मैदानात स्वतःची दुचाकी पेटवून केंद्र सरकारचा निषेध केला.यावेळी सरकारच्या विरोधात घोषणा देऊन निदर्शने करण्यात आली. संपूर्ण देशात पेट्रोल व डिझेलचे सर्वाधिक दर महाराष्ट्रात लागू आहेत.
या दरवाढीमुळे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सर्वसामान्यांची सर्रास लूट सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. केंद्र व महाराष्ट्र शासनाने पेट्रोल, डिझेल व गॅसवर केलेली दरवाढ तत्काळ कमी करावी या मागणीकरिता समता सैनिक दल संरक्षण विभागप्रमुख प्रदीप कांबळे यांच्या नेतृत्वाखाली त्यांची स्वतःची दुचाकी पेटवून निदर्शने करण्यात आली.यावेळी समता सैनिक दल जिल्हा संघटक अभय कुंभारे, अमोल ताकसांडे, चंदू भगत, रोशन कांबळे, पप्पू पाटील, विक्की वागदे, ज्योती ताकसांडे, अतुल कांबळे, सीमा वाघमारे, लक्ष्मी ताकसांडे, सम्यक ताकसांडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.