जुन्या वादातून युवकास दगडाने मारहाण

हिंगणघाट : जुन्या वादातून युवकाला दगडाने मारहाण करीत जखमी केले. हरिओम सभागृहासमोर ही घटना घडली. नयन जवादे याने दुचाकीला कट का मारला असे विचारले असता हर्षल चंदनखेडे आणि अखिलेश उके यांनी शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली होती. नयन जवादे आपल्या भावंडासोबत हरिओम सभागृहाजवळ चहा पिण्यास गेला असता तेथे असलेल्या हर्षल चंदनखेडे, अखिळेश उके यांनी शिवीगाळ करीत दगडाने मारहाण केली. याप्रकरणी हिंगणघाट पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली पुढील तपास पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here