क्षुल्लक वादातून व्यक्तीस धारदार शस्त्राने मारहाण

वर्धा : वडिलांना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका का बोलाविली, असे म्हणत चौघांनी व्यक्तीस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सिंदी मेघे परिसरात ही घटना घडली. रविराज भगत हा घरी असतान विनोद कांबळे याने तू माझ्या वडिलांना रुग्णालयात पाठविण्यासाठी रुग्णवाहिका का बोलाविली, असे म्हणत शिवीगाळ केली. या कारणातून विनोद कांबळे, माधुरी सुटे, समीर सुटे, प्रशांत भगत यांनी रविराज याला धारदार शस्त्राने मारहाण करीत जखमी केले. याप्रकरणी रामनगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here