ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

हिंगणघाट : भरधाव ट्रॅक्टरचालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीचालक जखमी झाला. चिंचोली ते चिकमोह रस्त्यावर हा अपघात झाला. आशिष पोरकर हा एम.एच. 3२ एएन. ६७११ क्रमांकाच्या दुचाकीने गावाकडे जात असताना समोरून भरधाव वाळूघाटाकडे जात असलेल्या ट्रॅक्टरने धडक दिली. या धडकेत आशिष गंभीर जखमी झाला. याप्रकरणी हिंगणघाट पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढीळ तपास पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here