उभ्या पाच ट्रकचा उडाला भडका! जिवीतहाणी टळली

वर्धा : शहरालगतच्या सावंगी (मेघे) टी पॉईंटलगतच्या रिपेअरींग सेंटरवर सात ट्रक उभे होते. अचानक आगीचा भडका उडाल्याने पाच ट्रक त्यामध्ये जळाल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे. ही घटना मंगळवारी रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान घडली.

सावंगी टी पॉईंटलगत रस्त्याच्या बाजूला नेहमीच ट्रकची गर्दी असते. येथील एका रिपेअरींग सेंटरवर सात ट्रक उभे होते. रात्री ८.३० च्या सुमारास एका ट्रकला आग लागल्याने ती पसरत गेली. पाहता पाहता पाच ट्रक कवेत घेतले असून दोन ट्रक बाहेर काढण्यात यश आले. वेळीच नगर पालिकेचे अग्नीशमन दल पोहोचून पाण्याचा मारा केल्याने आग आटोक्यात आली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी विशाल नाईक, चेतन खंडारे, अमजद अली, अमोल डोईफोडे, मयूर सोनवने, गौरव शेगावकर, अश्‍विन खंडारे, स्प्दधार्थ नरकवाडे यांच्यासह सावंगी पोलिसांनी परिश्रम घेतले. यात कोणतीही जिवीतहाणी झाली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here