वीज पडून सत्तावीस वर्षीय युवकाचा मृत्यू! परिसरात हळहळ

देवळी : तालुक्यातील नांदोरा डफरे येथील प्रशांत किसनाजी डफरे वय (२७ वर्षे) याचा वीज पडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार (ता. १६) ४ वाजताच्या सुमारास घडली.

अचानक जोरदार पाऊसाला सुरुवात झाली, जोरदार पाऊस आणि विजांचा गडगडाट सुरु होता अशातच शेतात असलेले बैल घरी आनण्यासाठी प्रशांत शेतात गेला असता वीज पडून मृत्यू झाला.

रात्रभर शेतात तसाच पडून राहिला, रात्री शोधा शोध केली असता प्रशांत मिळाला नाही आणि आज सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला. काही दिवसापूर्वी प्रशांतच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. प्रशांत कडे दहा एकर शेती असून प्रशांत हा कर्ता आणि कुटूंबाचा आधार होता. त्याच्या जाण्याने गावात शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here