दुचाकीवरून आलेल्या दोघांनी केले तलवारीने वार! कारला रोड परिसरातील घटना; रामनगर ठाण्यात गुन्हा दाखल

वर्धा : मित्राला भेटण्यासाठी दुचाकीने जात असलेल्या युवकावर मागाहून दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात युवकांनी तलवारीने वार करीत जखमी केले. ही घटना १४ रोजी रात्रीच्या सुमारास कारला रोड परिसरात असलेल्या ओम टाईल्स दुकानासमोर घडली. याप्रकरणी १५ रोजी रामनगर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. निखील अनंत कारमोरे (२२ रा. कारला रोड) असे जखमीचे नाव असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

निखील कारमोरे हा रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास एम.एच. ३२, यू, ८१८० क्रमांकाच्या मोटारीने शिक्षक कॉलनी परिसरात राहणारा त्याचा मित्र प्रवीण परसगाले याला भेटण्यासाठी जात होता. दरम्यान, मागाहून काळ्या आणि लाल रंगाच्या दुचाकीवर भरधाव आलेल्या दोघांनी निखीलवर तलवारीने वार केला. दोन्ही अज्ञातांनी तोंडाला रुमाल बांधला होता. मागे बसलेल्याने मागाहून पाठीवर तलवारीने वार केला आणि दुसरा वार मानेवर केला. यात निखील गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रामनगर पोलिसांनी या प्रकरणात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेणे सुरू असल्याची माहिती रामनगर पोलिसांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here