
सिंदी (रेल्वे) : समीपच्या सेलडोह गावातील तीन दुकाने फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख सुमारे ६ हजार रुपये, पांच मोबाईलसह काजू, बदाम आदी मेवा चोरून नेला. ही सदर घटना आज शुक्रवारी उघडकीस आली.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री गावात भागवतावर प्रवचन सुरू होते. रात्रीच्या प्रहरी झोपले असतांना अज्ञात चोरट्यांनी डाव साधला. सदर लोकवस्ती समृध्दी महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग ३६१ च्या मध्यभागी आहे. मुख्य मार्गावरील भास्कर खोडे यांच्या किराणा दुकानातून सुकामेवा व रोख २ हजार रुपये, यादव सोनटक्के यांच्या दुकानातून पाच मोबाईल व १२०० रुपये, गोपाल दांडेकर यांच्या दुकानवजा घरातून नगदी तीन हजारपेक्षा अधिक मुद्देमाल ल॑पास केला.
याप्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार चंद्रशेखर चकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सतीश हांडे, बळवंत पिंपळकर व सहकारी करीत आहेत.



















































