पोलिसांचा जुगारअडुयावर छापा! तीन जणांवर गुन्हा दाखल

वर्धा : आर्वी शहरात सुरू असलेल्या जुगारअडआ्यावर पोलिसांनी छापा टाकून तीन जणांवर गुन्हा दाखळ केला. आरोपीकडून जुगार, सट्टापट्टीचे साहित्य व रोख जप्त केले. प्राप्त माहितीनुसार, आर्वी शहरात गत काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात जुगार, सट्टापट्टी अवैध मार्गाने सुरु असल्याची पोलिसांनी मिळाली. त्याच माहितीच्या आधारे पोलिसांनी शहरात सुरु असलेल्या दोन ठिकाणी छापा टाकून रोख व साहित्य जप्त केले.

येथील मोरेश्वर सुरुजसे (वय 35) रा. शिवाजी वार्ड व दिपक वाकोडे (वय 32) रा. आसोले ले-आऊट यांच्या घरून पोलिसांनी जुगारातील साहित्य व रोख असा एकूण ७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर मोरेश्वर ज्ञानेश्‍वर सुरजुसे (वय 35) रा. शिवाजी वार्ड या आरोपीकडून सदट्टापट्टीचे साहित्य व नगदी असा एकूण ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आर्वी पोलिस ठाण्यात तीन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here