

पवनार : पत्नीला किराणा दुकानातून साहित्य आनायला सांगून आपल्या राहत्या घरी स्वयंपाक घरातील खोलीत घराच्या फाट्याला दोर बांधुन गळफास घेतल्याची घटना मंगळवार (ता.१९) सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली. दिलीप राघोजी चूटे वय २७ वर्षे रा. वार्ड क्रमांक ६ पवनार असे गळफास घेतलेल्या युवकाचे नाव आहे.
दिलीप त्याच्या कुटूंबात आई, पत्नी आणि मुलगी असा सर्वांचे तो पालनपोषण करीत होता. दिलीप हा ट्रक चालक म्हणून काम करायचा, काही दिवसापासून तो सतत दारुच्या नसेत राहत असल्याचे सांगण्यात येत आहे. याच दारुच्या नशेत त्याने आज सायंकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेत आपले जीवण संपविले. घटनेची माहिती मिळताच सेवाग्राम पोलिस घटनास्थळी येत पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासनिकरीता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला. मृत्यूचे कारण अद्याप कळले नसून सेवाग्राम पोलिस पुढील तपास चालू आहे.