सीआरपीएफ जवानाच्या घरावर हल्ला करणाऱ्यांना न्यायालयीन कोठडी! गावठी बॉम्ब अन्‌ तलवार घेऊन आरोपींनी गाठले होते जवानाचे घर

तळेगाव (श्या.पंत) : दिवाळीचे औचित्य साधून गावात परतलेल्या सीआरपीएफच्या जवानाच्या घरावर हातात तलवार व गावठी बॉम्ब घेऊन हल्ला चढविण्यात आला. या प्रकरणी तळेगाव पोलिसांनी गडचिरोली येथे कार्यरत असलेल्या सीआरपीएफचे जवान अमित अनिल घावडे यांच्या तक्रारीवरून गुन्ह्याची नोद घेत तळेगाव येथीलच रहिवासी असलेल्या आरोपी अण्णा सिंग बादलसिग बावरी व जेलसिंग बावरी याला अटक केली आहे. याच दोन्ही आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर केले. असता. आरोपींना पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here