दुचाकी अपघातात दोन युवक जखमी! भरधाव दुचाकी रस्त्यावरुन घसरली

अल्लीपूर : भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात दोन दुचाकीस्वार जखमी झाले असून यातील एक गंभीर आहे. हा अपघात अल्लीपूर ते सिरसगाव मार्गावरील भगवा चौरस्त्याजवळ झाला.

विजय खेलकर (३६) व नितीन वाघमारे (४२) हे दोघेही अल्लीपूर येथून दुचाकीने जात होते, भरधाव असलेल्या दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्त्यावरुन दूरवर घसरत गेली. यामध्ये विजय खेलकर याच्या डोक्याला जबर दुखापत झाली. अपघाताची माहिती अल्लीपुरचे सरपंच नितीन चंदनखेडे, सदस्य हारुन अली, सतिश काळे यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. दोन्ही जखमींना वाहनात टाकून प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. डॉ. काळबांडे यांनी प्राथमिक उपचार करुन दोघांनाही जबर दुखापत झाल्याने त्यांना दुसरीकडे हलविण्याचा सल्ला दिला. त्यामुळे त्यांना तातडीने वर्धेला दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहे. पोलीस कर्मचारी त्र्यंबक मडावी यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here