धावत्या ट्रकच्या कॅबिनने घेतला पेट! चालकाचा जीव थोडक्यात वाचला

वर्धा : अचानक धावत्या ट्रकच्या कॅबिनने पेट घेतला यात ट्रकची कँबीन जळून खाक झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग नागपूर अमरावती महामार्गावर आज सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान घडली. चालकाने वेळीच ट्रकखाली उडी घेतल्याने चालकाचा जीव थोडक्यात वाचला.

वाडी येथून ट्रक क्र.महा 04 जी एफ 3257 चा ट्रक लोखंडाचे साहित्य मुंबई येथे घेऊन जात असताना नागपूर अमरावती महामार्गवरील सावळी (बु) फाट्याजवळ अचानक ट्रकच्या कँबीनने पेट घेतला चालकाला माहिती होताच चालकाने आपल्या ताब्यातील ट्रक रस्त्याच्या कडेला घेऊन थांबविला आणि आपला कसाबसा जीव वाचवला. घटनेची माहिती मिळताच कारंजा पोलीस घटनास्थळी पोहचली मात्र अग्निशामक नसल्यामुळे ओरीयंटल टोल प्लाझा वरील टँकर पाठवून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला मात्र तोपर्यंत ट्रकची संपूर्ण कॅबिन जळून खाक झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here