युवतीला मारहाण करीत केला विनयभंग

हिंगणघाट : युवतीला मारहाण करीत तिचा विनयभंग करण्यात आल्याची घटना डांगरी वॉर्डातील आठवडी बाजारात घडली. युवती आणि स्वप्नील वाकडे हे दोघे कॅटर्सम्रध्ये काम करीत होते. दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले; पण, स्वप्नील विनाकारण त्रास द्यायचा, यामुळे युवतीने प्रेमसंबंध तोडले; मात्र तरीही स्वप्नीलने युवतीचा पाठलाग करून माझ्याशी बोलत का नाही, असे म्हणत असभ्य वर्तन करून मारहाण करीत विनयभंग केला. याप्रकरणी हिंगणघाट पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here