रस्ता उठला जीवावर! दोघे दुचाकीचालक जखमी; देवळी-दहेगाव मार्गावर अपघात मालिका

चिकणी (जामणी) : चिकणी-जामणी-दहेगाव या नऊ किमीच्या मार्गावर ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे पडले असून, बुधवारी खड्डे चुकविण्याच्या नादात दोन अपघात झाले आहेत. या घटनेत दोघे दुचाकी चालक जखमी झाले आहित. या मार्गावर ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे पडले असून, ते रात्रीच्या सुमारास वाहनचालकांना सहज निदर्शनास येत नाहीत.

या मार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी असतानाही बांधकाम विभाग त्याकडे दुर्लक्ष करण्यात धन्यता मानत आहे. या मार्गावरून ये-जा करणाऱ्यांची वाहने नादुरुस्त होणे ही नित्याची बाब झाली असून, आता हा खड्डेमय रस्ता वाहनचालकांच्या जीवावरच उठल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. बुधवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास चिकणी शिवारात साखऱ्या नाल्याजवळ खड्डे चुकविण्याच्या नादात दुचाकी अनियंत्रित होत अपघात झाला.

यात गजानन नेहारे (रा. पढेगाव) हे जखमी झाले, तर या अपघातानंतर याच मार्गावरील चिकणीजवळील कॅनॉलशेजारी खड्डे चुकविण्याच्या नादात आणखी एक अपघात झाला. यात चिकणी येथील रवींद्र माणिकपुरे हे जखमी झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here