रॉडसह चालल्या लाठ्या अन्‌ काठ्या! व्यक्‍ती गंभीर; नांदगाव येथील घटनेने खळबळ: आरोपी बाप-लेकास पोलिसांनी ठोकल्या बेड्या

वर्धा : आपल्याला शिवीगाळ केल्याचा गैरसमज मनात धरुन बापलेकाने एका ४८ वर्षीय व्यक्‍तीला लाठ्या अन्‌ काठ्या तसेच रॉडने जबर मारहाण करुन गंभीर जखमी केले. ही घटना नांदगाव येथे ५ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी आरोपींना अटक केल्याची माहिती आहे. सुभाष बाळकृष्ण मांगरुटकर असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. सुभाष आणि त्याची पत्नी या दोघांचा जुन्या कारणातून घरगुती वाद सुरू होता.

दरम्यान, शेजारी असलेल्या नामदेव लक्ष्मण शिरसावळे आणि त्याचा मुलगा राकेश नामदेव शिरसावळे यांना सुभाष आपल्याला शिवीगाळ करतोय, असा मनात संशय आला आणि याच गैरसमजुतीतून दोघांनी सुभाषच्या घरासमोर जात त्याला रॉड, लाठ्या काठ्यांनी जबर मारहाण केली. या घटनेत सुभाष गंभीर जखमी झाला. याप्रकरणी हिंगणघाट पोलिसात सुभाषने तक्रार दाखल केली असून पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केल्याची माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here