भरधाव कार उलटली; पती-पत्नी गंभीर जखमी

अल्लीपूर : भरधाव कार अनियंत्रित होत उलटली. यात कारमधील पती-पत्नी गंभीर जखमी झाले. हा अपघात नेरी मीरापूर शिवारात घडला.

प्राप्त माहितीनुसार, एम. एच. ३४ ए.एच. ४१५८ क्रमांकाच्या कारने एक दाम्पत्य चंद्रपूरकडून अमरावतीच्या दिशेने जात होते. कार नेरी मीरापूर शिवारात आली असता वाहनचालकाचे कारवरील नियंत्रण सुटले.

यात कार अनियंत्रित होत उलटल्याने कारमधील दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना परिसरातील नागरिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची नोंद अल्लीपूर पोलिसांनी घेतली असून, जखमींची नावे कळू शकले नाही. पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here