नागपूर – तुळजापूर महामार्गावर शेतकऱ्यांनी केला रस्ता रोको आंदोलन! वाहतुक अर्धा तास ठप्प; वाहनांच्या लांबच लांब रांगा

राहुल काशीकर

वर्धा : शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात पवनार येथील चौरस्त्यावर शेतकऱ्यांनी आज रास्ता रोको आंदोलन केले. वर्ध्यात दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला समर्थन देण्यासाठी गेल्या ५३ दिवसापासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. देशभरातुन पुकारलेल्या चक्का जाम आंदोलनाला प्रतिसाद म्हणुन शेतकरी कामगार आंदोलन समन्वय समिती तर्फे आज शेतकरी पवनार येथे रस्त्यावर उतरले. हातात तिरंगा झेंडा घेऊन चक्का ज्याम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महिलांही सहभागी झाल्या आहेत.

मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी करत रास्ता रोको करण्यात आला. रास्ता रोको दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. नागपूर – तुळजापूर महामार्ग शेतकऱ्यांनी अर्धा तास रोखून धरला होता. मोठ्या प्रमाणात या आंदोलनाला प्रतिसाद होता.

विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा ताफा याच मार्गाने वर्ध्यात पोहचला होता. नितीन गडकरी यांच्या दौऱ्यामुळे रास्ता रोको आंदोलन चांगलेच चर्चेत आले. आज वर्ध्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी , राज्यमंत्री बच्चू कडू, पालकमंत्री सुनील केदार आदी मंत्री आहेत. पवनार येथील शेतकऱ्यांच्या रास्ता रोकोने मंत्र्यांसह प्रशासनाचे लक्ष या आंदोलनाकडे वेधले होते. अर्धा तास चाललेल्या आंदोलनानंतर शेकडो कार्यकर्त्यांना सेवाग्राम पोलिसांकडून स्थानबद्ध करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here