अल्पवयीन गरोदर मुलीचा लावला विवाह! गुन्हा दाखल

वर्धा : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून गर्भधारणा झाल्याने तिच्या घरच्यांनी तिचा तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्यासोबतच विवाह लावून दिल्याची धक्कादायक घटना पुढे आल्याने पुलगाव पोलिसांनी पीडितेच्या आई-वडिलांसह अत्याचार करणाऱ्या युवकांवर आणि युवकाच्या घरातील मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पुलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गावातील एका १६ वर्षीय मुलीशी राजकुमार नामक युवकाने जवळीक साधून तिच्यावर अत्याचार केला. अशातच पीडिताला गर्भधारणा झाल्याने ही बाब उघडकीस आली. दरम्यान, पीडितेच्या घरच्यांनी ती अल्पवयीन असतानाही तिचा विवाह राजकुमारशी लावून दिला. या घटनेची माहिती होताच पोलिसांनी वेळीच दखल घेत कारवाई केली. याप्रकरणी पीडितेच्या कुटुंबातील सदस्य तसेच राजकुमारच्या घरातील मंडळी अशा एकूण सात व्यक्तींविरुद्ध पुलगाव पोलीस ठाण्यात भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here