बलात्कारातील आरोपी निघाला अट्टल गुन्हेगार! दोन दुचाकी जप्त; घरफोडीचेही गुन्हे दाखल

हिंगणघाट : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपात अटकेत असलेल्या आरोपीची सखोल तपासणी केळी असता तो अट्टल गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्याकडून चोरीतील दोन दुचाकीही जप्त करण्यात आल्या आहे.

विशाल ऊर्फ वांढूर वसंत उरवते (१९) रा. संत कबीर वॉर्ड, हिंगणघाट, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. डीबी पथकाने त्याला अटक केली असून, परिसरात पोलिसांनी तपास केला असता तो अट्टुल गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले. त्याच्याविरुद्ध यवतमाळ, पांढरकवडा, वरोरा, नागपूर (शहर) व बुट्टीबोरी येथे चोरी व घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल आहे.

आरोपीची सखोल चौकशी केली असता त्याने हिंगणघाट आणि पांढरकवडा येथूल दोन दुचाकी चोरल्याची कबुली दिली. दोन्ही दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रश्नांत होळकर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, पोलीस निरीक्षक संपत चव्हाण यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक पपीन रामटेके, शेखर डोगरे, नीलेश तेलरांधे, सचिन घेवंदे, सचिन भारशंकर, विदेक बनसोड यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here