

वर्धा : तुलसी फाऊंडेशन, नाचनगावब, तहसील देवळी, जिल्हा वर्धा व अँमी स्टार सॅनिटरी नॅपकीन (तुलसी रत्न इंटर प्राईझेस) बुटीबोरी, नागपूर, यांच्या संयुक्त विद्यमानाने गाव पातळीवर “मासिक पाळी जनजागृती अभियान” राबविण्यास सुरवात केलेली आहे, त्या अभियानांतर्गत महात्मा गांधी प्राकृतिक जिवन विद्यापीठ सेवाग्राम, वर्धा येथे विद्यापीठातील प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थीनिंकरिता दिनांक १२/१२/२०२९ ला एक दिवसीय मासिक पाळी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले गेले.
त्यानिमित्त विद्यापीठातील विद्यार्थीनिंना मासिक पाळीबद्दल डॉ. धनंजय तुळसा सुरेशराव पाणबुडे व महिलांचे आजार या विषयावर डॉ. प्रशांत तळवेकर यांनी योग्य असे अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले, त्यात महिलांच्या जीवनात आरोग्याच्या दृष्टीने मासिक पाळीचे महत्व, शारीरिक बदल, शरीरावर होणारे चांगले व वाईट परिणाम, मासिक पाळी दरम्यान कोणती काळजी घ्यावी, आहार, मासिक पाळीच्या समस्या, व शंकाचे समाधान करण्यात आले. मासिक पाळी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्याकरिता तुलसी फाऊंडेशन व तुलसी रत्न इंटर प्राईझेस च्या संस्थापिका व अध्यक्षा कु. मोनिका रामेश्वर साखरकर यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमात विद्यापीठातील विद्यार्थीनि मोठया प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.