ट्रक उलटल्याने दोघे गंभीर! आर्वी-देऊरवाडा मार्गावरील भीषण अपघात

आर्वी : आर्वी-देऊरवाडा मार्गावरील तंत्रनिकेतन महाविद्यालयासमोर भरधाव ट्रक अनियंत्रित होत उलटला. यात दोघे जखमी झालेत. अमरावतीकडून एमएच ०४ बीजी ५९७४ क्रमांकाचा ट्रक माल घेऊन आर्वीच्या दिशेने येत होता, अशातच काही कारणाने चालकाने तातडीने ब्रेक मारला. अशातच भरधाव ट्रक अनियंत्रित होत उलटला.

यात ट्रकचालक किशोर शेंदरकर (४०, रा. नांदगाव पेठ) हा तसेच एक व्यक्‍ती जंभीर जखमी झाला. ट्रक उलटताच वाहनातील सर्व साहित्य रस्त्यावर विखुरले गेल्याने वाहतूक प्रभावित झाली होती. अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमींना रुग्णालयाकडे रवाना केले. या अपघाताची नोंद आर्वी पोलिसांनी घेतली असून दुसऱ्या जखमीचे नाव कळू शकले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here