


वर्धा : जिल्हा बजरंग दलाच्या आज झालेल्या बैठकीत नवीन पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली. या बैठकीत प्रशांत यादव यांची वर्धा जिल्हा बजरंग दल गऊरक्षा प्रमुख म्हणून, तर अंबुज पांडे यांची विद्यार्थी प्रमुख म्हणून निवड करण्यात आली.
या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी “श्रीरामचंद्र प्रभू आपल्या पुढील वाटचालीसाठी व हिंदू धर्माच्या कार्यासाठी शक्ती प्रदान करो” अशी भावना व्यक्त केली. बैठकीस स्वावलंबी भारतचे अटल पांडे, जिल्हा प्रभारी मुन्ना यादव, जिल्हा संयोजक महेश राऊत, नगर संयोजक किरण उपाध्याय, तसेच अमन मिश्रा, गोविंद पांडे, रवी सिंग, महेंद्र प्रताप सिंग, जितू वर्मा, कुमार बहादूर सिंग, रुद्र यादव आदी मान्यवर उपस्थित होते.