विजय गोपाल परिसराला अतिवृष्टीचा तडाखा! नदी-नाले भरल्याने शेतांमध्ये शिरले पाणी; शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

मयुर अवसरे

विजय गोपाल : परिसरात सोमवार (ता. १४) रात्रीच्या झालेल्या मुसळधार पावसाने शेतकरी राजा सुखावला असला तरी काही भागात मात्र अतिवृष्टीचा तडाखा बसला असून पावसाच्या पाण्याने नदी-नाल्यांना पूर आला त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

परिणामीम परिसरातील शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवणार आहे. अतिवृष्टीने शेतकऱ्यांची शेती जलमय झाल्याचे चित्र दिसून आले. नदी-नाल्यांच्या पुरामध्ये अनेक शेतकर्यांची शेती पाण्याखाली आल्यामुळे या शेताचा पंचनामा करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

या पावसात शेतकरी कमर अली सय्यद, ज्ञानेश्वर श्रीरामे, जयपाल सिंग, धुमाळे मैफल, सिंग धुमाळे, मनोज धुमाळे. प्रकाश नानोटी, वीरेंद्र देशपांडे, करण टॅटू, प्रशांत अवसरे, गणेश शेख, पांडुरंग डगवार, अशोक मारोडकर, वीरेंद्र झोरे, रवींद्र झोरे, रवींद्र डांगे या शेतकऱ्यांचे शेत जलमय झाल्यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे या शेतात त्वरित पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी प्रशासनाकडे शेतकऱ्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here