

वर्धा : कोरोना महामारीच्या काळात देशात ई-कॉमर्स कंपन्या अधिक सक्रिय झाल्या आहेत. या कंपन्यांकडून वारंवार कायद्याचे उल्लंघन केले जात आहे. व्यापार क्षेत्रामध्ये ग्राहकांसोबतचा विश्वास हीच व्यापाराची सर्वात मोठी पुंजी आहे. परंतु याचाच गैरफायदा अनेक ई-कॉमर्स कंपन्या घेत आहेत व त्यांची मनमानी सुरू आहे.
केंद्र सरकारने या संदर्भात कायद्यानुसार त्यांच्यावर नियंत्रण आणणे आवश्यक आहे, अशी मागणी वर्धा जिल्हा कंझुमर प्रोडक्ट डिस्ट्रिब्युटर्स असोसिएशनने केली आहे. गुरुवारी या संदर्भात देशव्यापी निदर्शने करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून वर्धा जिल्हा कंझुमर प्रोडक्ट डिस्ट्रिब्युटर्स असोसिएशनच्या निवेदन देण्यात आले.
यात या कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. निवेदन देताना सचिव गणेश देवाणी, अध्यक्ष प्रवीण जैन, संजय टावरी, अनिल केला, योगेश दोशी, दिलीप द्रोन, भगवान आहुजा, मयूर दोशी, देवेंद्र देशमुख, बंटी पांडे, पंकज सोमानी, वसंत भुतडा आदी उपस्थित होते.