दोन दुचाकींची धडक! एकाचा मृत्यू; तीन गंभीर: केळझर येथील घटना

Photo of helmet and motorcycle on road, the concept of road accidents

केळझर : येथे दोन दुचाकी परस्परांवर आदळल्याने एक दुचाकीस्वार ठार झाला, तर एका महिलेसह पाचजण जखमी झालेत. यातील तिघे गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. हा अपघात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास शहीद स्मारकाजवळ झाला. केळझर येथील अंकुश भास्कर राऊत (वय ३५) व चंद्रभान डोंगरे (५४) हे दोघेही एम.एच. ३१ ई. आर. ३९६६ क्रमांकाच्या दुचाकीने शहीद स्मारकालगतच्या वळण रस्त्यावरून बेघर वस्तीकडे जात होते.

या दरम्यान कोटंबा येथून महेश दिनकर तुमडाम (२५), महेश नामदेव मरस्कोल्हे (२३) व आणखी एकजण असे तिघे एम.एम ३७ ए.एस. ९९९० क्रमांकाच्या दुचाकीने आमगाव (खडगी) कडे जात होते. या दोन्ही दुचाकी समोरासमोर धडकल्याने या दोन्ही दुचाकीवरील पाचजणांसह पायदळ घरी जात असलेल्या दुर्गा सोनोने (६०) ह्या जखमी झाल्या. यात अंकुश भास्कर राऊत याचा मृत्यू झाला.

गावकऱ्यांनी जखमींना सेलूंच्या ग्रामीण रुणालयात दाखल केले; परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना सेवाग्रामला हलविण्यात आले. महिलेसह आणखी एक किरकोळ जखमी असून उर्वरित तिघे गंभीर जखमी आहेत. याप्रकरणी सेलू पोलिसांत अपघाताची नोंद घेण्यात आली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नलावडे पुढील तपास करीत आहे. दोघांचीही वाहने वळण मार्गावर भरधाव असल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here