३ ठिकाणी सट्टापट्टीवर छापे! ५ जणांवर गुन्हे दाखल

वर्धा : गत काही दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय वाढले आहे. अवैध जुगार, सट्टापट्टीचा व्यवसाय अनेक तरुण करीत आहेत. या अवैध व्यवसायाला आळा घालण्यासाठी पोलिसांनी पुलगाव, वर्धा, आवी येथे छापा टाकून 5 जणांवर गुन्हा दाखल केला. आरोपीकडून मुद्देमाल जप्त केला आहे.

पुलगाव पोलिसांनी छत्रपती महादेव गेटमे रा. वडाळा या आरोपीकडून सट्टापट्टीचे साहित्य व रोख असा एकूण ५४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. वर्धा पोलिसांनी दयालनगर येथील सुनील पेरुमल आहुजा (४२) व श्याम दुबानी या दोन आरोपींकडून सट्टापट्टीचे साहित्य व रोख असा एकूण ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

बोरगाव (मेघे ) येथील गिट्टी खदान परिसरातील लटारी राधोजी चांदेकक (वय ४५) या आरेपीकडून जुगाराचे साहित्य व रोख असा एकूण १४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर आर्वी पोलिसांनी कौंडण्यपूर येथील मंगेश संजय गोरडे (३०) या आरोपीकडून जुंगाराचे साहित्य व रोख असा एकूण ४३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पुलगाव, वर्धा, आर्वी पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here