आष्टीच्या तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून महिला कर्मचाऱ्यासोबत अश्लील संवाद! गैरअर्जदाराची चौकशी करतेय महिला तालुका कृषी अधिकारी

वर्धा : आष्टी येथील तालुका कृषी अधिकारीपदाचा पदभार सांभाळणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्याने कार्यालयातीलच एका महिला कर्मचाऱ्यासोबत अश्लील संवाद साधल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. विशेष म्हणजे या गैरअर्जदार अधिकाऱ्याने केलेल्या प्रकाराची चौकशी महिला तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून केली जात आहे.

आष्टी येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील या पीडित महिला कर्मचाऱ्याच्या मनमोकळ्या स्वभावाचा फायदा घेत प्रभारी तालुका कृषी अधिकारी सिद्धप्पा नडगेरी यांनी महिला कर्मचाऱ्याच्या मोबाईलवर अश्लील मॅसेज पाठवून पीडितेला मानसिक त्रास दिला. एका जबाबदार अधिकाऱ्याने केलेला हा प्रकार निंदनीय असल्याने पीडितेने याची रीतसर लेखी तक्रार कृषी विभागातील बड्या अधिकाऱ्यांकडे पुराव्यानिशी केली. त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी आर्वी येथील महिला कृषी अधिकारी सुप्रिया वायवल यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. या महिला कृषी अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची संपूर्ण चौकशी पूर्ण केली असून लवकरच त्या आपला चौकशी अहवाल वरिष्ठांना सादर करणार आहेत.

गैरअर्जदार पदावर अजूनही कायमच

पीडितेने ज्या प्रभारी तालुका कृषी अधिकाऱ्यावर गंभीर आरोप लावलेत तो अधिकारी चोकशी प्रस्तावित झाल्यावरही आष्टी तालुक्‍याच्या कृषी विभागाचा प्रभारी म्हणून काम पाहत आहे तर पीडित महिलेला नागपूर येथील विभागीय कृषी सह- संचालक कार्यालयात तत्पूर्वी उच-लबांगडी करण्यात आली आहे.

पोलिसांकडे प्रकरण जाऊ न देण्यासाठी दबाव?

पीडित महिलेने तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराची माहिती काहींना सांगितली. पण त्यावेळी बड्या अधिकार्‍यांकडून हे प्रकरण पोलीस कचेरीपर्यंत जाऊ न देण्यासाठी दबाव आणण्यात आल्याची चर्चा कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये होत आहे.

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here