त्या आरोपी बँक मित्रांना रविवारपर्यंत पीसीआर! कोटींची फसवणूक प्रकरण

आर्वी : ग्राहकांच्या लाखो रुपयांची हेराफेरी करणाऱ्या दोन बँक मित्रांना येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाने मंगळवारी रविवार २२ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. येथील बँक ऑफ इंडियाचे बँक मिञ सचिन राऊत व दिनेश तायवाडे यांना पोलिसांनी ग्राहकांच्या तक्रारी वरून अटक केली.

अशोक महादेव वाटकर रा. नेरी पुनर्वसन तालुका आर्वी जिल्हा वर्धा यांच्यासह अनेक ग्राहकांची या दोघा बँक मित्रांनी फसवणूक केली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर तपासासाठी हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आहे. या दोघांनी ग्राहकांना कोटींचा गंडा घातल्याचे पुढे आले असून त्या दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. हे प्रकरण पुढे कुठले वळण घेते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here