आर्वीत आठ जुगाऱ्यांवर झाली कारवाई! १८६० रुपये जप्त

आर्वी : आर्वी शहरात जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता आर्वी पोलिसांनी जुगार अह्र्यावर छापा मारुन आठ जुगाऱ्यांन रंगेहात जुगारावर डाव लावताना अटक केली. पोलिसांनी हरेश वामन गाडगे, संतोष लक्ष्मण चावरे, दिपक रामकिसन चावरे, अजय रामदास चावरे यांना जुगार खेळताना अटक केली, त्यांच्याकडून ताशपत्त्यांसह एकूण १८६० रुपये जप्त केले.

योगेश बाबाराव नागदेवते, रोशन भास्कर बुराडे, नरेंद्र दिवाकर कोहळे, शैलेश उकंडराव निंबाळकर यांच्यावर कारवाई करीत 3 हजार ६२० रुपये जप्त करण्यात आले. पोलिसांनी आठ जुगाऱ्यांना अटक करुन आर्वी पोलिसात गुन्हे दाखल केले असून यामुळे जुगाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here