फसवे एसएमएस, मेल्स देतील चकवा! लॉटरी लागल्याचे ई-मेल किंवा मेसेजेस आल्यास सावध राहा; सावध राहण्याची गरज

वर्धा : तुम्हाला लॉटरी लागली आहे… बक्षीस मिळविण्यासाठी काही रक्‍कम भरा… ई मेल करा… असे सांगून किंवा आता तर थेट व्होट्सअपवर मेसेज टाकून॒ सायबर चोरट्यांकडून फसवणुकीचा नवा फंडा सुरू झालेला आहे. त्यामुळे असे फसवे ई मेल आणि एसएमएस चकवा देऊन तुमच्या खात्यातून परस्पर पैसे लंपास करतात. त्यामुळे नागरिकांनो अशा फसव्या मेसेजेसपासून सावध राहावे, असे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे.

सध्याच्या डिजिटल युगात विविध प्रकारची आमिषे दाखविणारे तसेच लॉटरी लागल्याचे मेसेज अनेकांच्या मोबाईलवर येत आहेत. मात्र, ही १०० टक्के फसवणूक असते. या माध्यमातून फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे असा मेसेज आलाच, तर त्याकडे दुर्लक्ष करा, नाही तर या जाळ्यात अडकून तुमची आर्थिक फसवणूक नक्कीच होईल, यात शंका नाही.

लोंटरी लागली, परदेशातून गिफ्ट पाठविले आहे, अशा प्रकारच्या आपिषांना नायजेरियन फ्रॉड म्हणून सायबर क्राईममध्ये ओळखले जाते. एखाद्या परदेशातील कंपनीच्या नावे ईमेल पाठविले जातात. ते मेल उघडल्यानंतर तुम्हाला काही तरी कारण दाखवून लॉटरी तिकीट लागल्याचे भासवले जाते. प्रत्यक्षात मात्र, तुम्ही लॉंटरीचे तिकीट काढले नसतानाही लॉटरी कशी लागणार हा विचार मनात येऊ नवे, यासाठी चोरटे आकर्षक पद्धतीने सावज हेरतात. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी अशा फसव्या ई मेल्सना बळी पडू नये, असे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले असून नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here