तरुणास ऑनलाइन गंडा! ५.२२ लाख लंपास

वर्धा : इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर नोकरीची जाहीरात तरुणाला मोठी महागात पडली असून तरुणाचा विश्‍वासघात करून अज्ञाताने त्याच्या बँक खात्यातून तब्बल पाच लाख २२ हजार १८० रुपयांची रक्‍कम ऑनलाइन काढून घेत फसवणूक केली. याप्रकरणी ६ रोजी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

घनश्याम दिगंबर शिंदे (रा. आंजी मोठी) याच्या मोबाइलवर त्याने इन्स्टाग्राम अकाउंट उघडले असता त्याला करिअर बिल्डर नावाची जाहीरात दिसली. त्याने त्यावर रिप्लाय पाठविला असता अज्ञाताने त्याला दोन वेळा १० हजार ५०० रुपये असे एकूण २१ हजार रुपये गुगल पे करण्यास सांगितले. त्यानंतर अज्ञाताने परतावा म्हणून १४ हजार 3२५ आणि दुसऱ्यांदा १५४ हजार २० रुपये घनश्यामच्या खात्यात परत पाठविले. त्यानंतर अज्ञाताने फोन करून घनश्यामला विश्‍वासात घेऊन विविध पद्धतीने गुगलपेवर व पैसे पाठविण्यास सांगून तब्बल पाच लाख २२ हजार १८० रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here