परिस्थितीवर मात करुन ज्ञानेश्वर माथनकर यांनी मिळवीले परिक्षेत सुयश! ग्रामस्थांकडून शुभेच्छा

हिंगणघाट : ज्ञानेश्वर दिवाकर माथनकर यांनी २७ डिसेंबर २०२० मध्ये घेण्यात आलेल्या SET च्या परीक्षेत घरच्या बिकट आर्थिक परिस्थितीवर मात करून अथक परिश्रम घेत प्राविण्य मिळवले. ज्ञानेश्वर पिंपळगाव येथील रहिवाशी असून त्याने भौतिकशास्त्र (Physics) विषयात प्राविण्य मिळवले आहे.

परीक्षेचा निकाल ७ एप्रिल २०२१ ला लागला त्यात ३०० पैकी १५२ गुण मिळाले. ज्ञानेश्वरने यशाचे श्रेय आई-वडिल आणि मोठे बंधू यांना दिले. पिंपळगाव वासियांनी आनंद व्यक्त करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here